Thorat Masala
img

आमच्या बद्दल

जगातील सर्वात प्राचीन सभ्य संस्कृती म्हणजेच आपला भारत देश.... विविधतेने नटलेल्या याच भारतात संस्कृती आणण परंपरासोबतच इथल्या खानपानात देखील विविधता दिसून येते. परिणाम स्वरूप खानपानात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये देखील वैविध्य आढळून येते. आपल्या देशाची ओळख ही जगातील सगळ्यात मोठी व प्राचीन मसाल्यांची बाजारपेठ अशी सुद्धा आहे, म्हणूनच की काय जागतिक मसाल्याच्या उत्पादनात आज भारताचा वाटा जवळपास ७५ टक्के इतका मोठा आहे.

भारतातील इतर कोणत्याही राजयांपेक्षा “ महाराष्ट्र ” हा नेहमीच पुरोगामी ठरल्यामुळे महाराष्ट्राने आपली खादयसंस्कृती देखील मोठया परंपरेने आजवर टिकवून धरली आहे. “ अन्न हे परब्रम्ह ” असं म्हणत समोर आलेल्या ताटाला नमस्कार करायचा आणण ताटवरून भरल्यापोटी उठताना “ अन्न दाता सुखी भव ” असा आशीर्वाद देत उठायचं ही आपल्या मराठी मातीची शिकवण आहे. महाराष्ट्रात पक्वान्नांचे स्वाद-सुगंध, शैली इतक्या विविध आहेत की प्रत्येक पदार्थाचे सेवन करणे म्हणजे जणू एक पर्वणीच असते. “ व्यक्ति तितक्या प्रकृती ”, या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील घराघरात पदार्थच काय... तर पदार्थातील मसाल्यांमध्ये सुदधा वैविध्य आढळते. पण मसाल्यांमधील हे वैविध्य परंपरागत टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही फार मोठी आहे, हे माहीत असुन देखील हे शिवधनुष्य पेलण्याच काम एका मंबुईतील मराठी तरुणाने केले त्यांचे नाव होते “ श्रीरामचंद्र कृष्णा थोरात ”.मध्य मंबुईचा लालबाग हा भाग नेहमीच उत्सवी राहिलेला आहे, किंबहुना उत्साह आणि उत्सव याचं दुसरं नाव म्हणजे “ लालबाग ” श्रीरामचंद्र कृष्णा थोरात हे सुध्दा लालबागकर... गिरणगावातील गिरण्या, गिरण्यांचे तिन्ही त्रिकाळ वाजणारे भोंगे, भोंग्यानुसर तीन पाळ्यांमध्ये काम करणारे गिरणी कामगार यामुळे गिरणगावचं ह्रदय असणार लालबाग हे नेहमी जागतं आणण धगधगत असायचं यातूनच प्रेरणा घेत श्री रामचंद्र कृष्णा थोरात यांनी दिनांक : ०१|०१|१९५५ रोजी लालबाग मधील गणेश नगर येथे “ थोरात मसाले स्टोअसणची ” स्थापना केली.

जेवनाचे उभट डबे घेऊन गिरणीच्या दिशेने घोळक्याने निघणाऱ्या कामगारांवर मंबुईची आर्थिक जबाबदारी होती, आणण त्यांच्या डब्यातून त्यांना मिळणारा प्रत्येक पदार्थ त्यांना हवा तसा चविष्ट व्हावा ही जबाबदारी थोरात मसाले स्टोअसाच्या श्री रामचंद्र यांनी घेतली होती. सुरवातीच्या काळात पारंपारीक पद्धतीने लाकडाच्या शेगडी वरती मिरच्या व गरम मसाले, खोबरे असे विविध प्रकारचे मसाल्याचे पदार्थ भाजून डंका वरती कुटले जावू लागले . मिल कामगार आपल्या घरगुती वापराचे मसाले बनवून घेण्यासाठी भल्या पहाटेच थोरातांच्या डंकावरती गर्दी करू लागले आणि बघता बघता “ थोरात

मसाले स्टोअर्सची ” ख्याती संपूर्ण गिरणगावात पसरली. काही कालातंराने रामचंद्र कृष्णा थोरात यांनी आपली दुसरी पिढी म्हणजेच आपल्या मुलांना काही कालातंराने रामचंद्र कृष्णा थोरात यांनी आपली दुसरी पिढी म्हणजेच आपल्या मुलांना महादेव रामचद्रं थोरात आणि जयवंत रामचंद्र थोरात यांना या व्यवसायात पुढे आणलं त्यांनी देखील हा फक्त व्यावसाय नसुन ही आपली जबाबदारी आहे याची जाण ठेवत आपल्या थोरात मसाल्याची परंपरा कायम ठेवली. आज जयवंत रामचंद्र थोरात यांनी आपले पुतणे मिलिंद थोरात व सुरज थोरात यांना आपल्या मसाला व्यावसायात आणल्यामुळे थोरात कुटुंबातील तिसऱ्या पिढीचा देखील या व्यावसाय पदार्पण झालेले आहे.

अगदी सरुवातीच्या काळात डंकानी वर मसाला कुटण्यासाठी रामचंद्र थोरात यांना जुन्या डंकाला दिवसभर पेडल मारावे लागत असे. आज इतक्या वर्षात दुकाने, यंत्र, आणि ग्राहक वर्ग जरी बदललेला असला तरी रामचंद्र थोरात यांनी मारलेल्या त्या पेडल मुळेच “ थोरात मसाले ” आजही बाजारात आपले अस्तित्व मोठ्या दिमाखात टिकवून आहे. महाराष्ट्रातील उपलब्ध असणाऱ्या मसाल्यांच्या तुलनेत “ थोरात मसाल्यांना ” चव, गंध आणि गुणवत्ता यामुळे महाराष्ट्रात आज वेगळं स्थान आहे. तीच चव आणि तोच मसाला देण्याची मोठी जबाबादरी थोरात कुटुंबियांनी

जपलली आहे. जवळपास पाच दशकाहून अधिक जुनी असणारी “ थोरातांच्या मसाल्याची ” परंपरा आजही कायम आहे, आणि कायमच राहील यात तिळमात्र शंका नाही....!

थोरात मसाले ...

Thorat Masala